नागपूर विद्यापीठाचा हॉलीबॉल महिला संघ हनुमानगड येथील पश्चिम क्षेत्रीय स्पर्धेत होणार सहभागी
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हॉलीबॉल महिला संघाची घोषणा क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ संचालक डॉ विशाखा जोशी यांनी केली आहे. हनुमानगड येथील श्री खुशाल दास विद्यापीठ येथे २७ ते ३० ऑक्टोबर २०२४ दरम्यान आयोजित पश्चिम क्षेत्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत ही चमू सहभागी होणार आहे.
विद्यापीठ व्हॉलीबॉल संघामध्ये जीएच रायसोनी विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नागपूरची खेळाडू लक्ष्मी घुगुस्कर, वर्धा येथील जीएस वाणिज्य महाविद्यालयाची कांचन रघाटाटे, केडीके अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूरची आकांक्षा फरकाडे, अनिरुद्ध देशमुख महाविद्यालय भारसिंगी येथील अहिंसा सोमकुंवर, एलएडी महिला महाविद्यालयाची सुरभी पाठक, रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाची माही तिवारी, देवळी येथील ज्ञानभारती महाविद्यालयाची भूमी रिठे, नबीरा महाविद्यालय काटोल येथील देव्यांनी वाळके, तुळशीराम गायकवाड अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रियंका बगेकर, सावनेर येथील डॉ हरिभाऊ आदमने महाविद्यालयाची कशिश बागडे, कमला नेहरू महाविद्यालय नागपूर येथील भूमी कुर्जेकर तर वसंतराव नाईक शासकीय कला व सामाजिक ज्ञान विज्ञान संस्था नागपूर येथील प्रिया डोंगरे यांचा समावेश आहे.
राखीव खेळाडूंमध्ये प्राची धोटे, प्रिया मेश्राम, ज्योती लोखंडे, उन्नती बागडे, रितीशा धांडे, तन्वी गोतमारे, सुहानी बिरबल, प्रेरणा मेंढेकर, देलिमा प्रसाद, जाई भोयर, माधुरी अंबादे, मानसी लाडे यांचा समावेश आहे. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे, कुलसचिव डॉ राजू हिवसे, क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ संचालक डॉ विशाखा जोशी यांनी निवड झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.