आर सी पटेल स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा
शिरपूर : आर सी पटेल स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील ग्रंथालय विभागातर्फे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ताने नुकताच ‘वाचन प्रेरणा दिवस’ मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे संचालक डॉ जे बी पाटील यांनी दिली.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ताने १५ ऑक्टोबर रोजी संपूर्ण देशात ‘वाचन प्रेरणा दिवस’ साजरा केला जातो. या निमित्ताने वाचन संस्कार वृद्धिंगत होण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. याचप्रमाणेच आर सी पटेल स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागातर्फे देखील ‘वाचन प्रेरणा दिन’ विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला. यात महाविद्यालयाचे उपसंचालक प्रा डॉ पी जे देवरे यांच्या हस्ते डॉ कलाम यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.
यावेळी मुख्य ग्रंथपाल प्रा महेश सोनवणे, महाविद्यालयातील सर्व विद्याशाखांचे विभाग प्रमुख तसेच अधिष्ठाता, प्राध्यापक मंडळी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी विविध ग्रंथ, संदर्भ ग्रंथ, नियतकालिके, कादंबरी, आत्मचरित्र आदी पुस्तकांचे प्रदर्शन देखील भरवण्यात आले. याचबरोबर काही विद्यार्थ्यांनी संपूर्ण दिवस ग्रंथालयात वाचन करून डॉ कलाम यांना आदरांजली अर्पण केली.
महाविद्यालयातील ग्रंथालयात तब्बल ३६५०० पुस्तके उपलब्ध असून त्यामध्ये ७२ हून अधिक जर्नल्स आहेत. शिवाय संपूर्ण ग्रंथालय संगणकीय प्रणालीद्वारे कार्यान्वित असून वातानुकूलित वाचनकक्ष देखील उपलब्ध आहेत. पटेल अभियांत्रिकीचे ग्रंथालय हे संपूर्ण आधुनिक प्रनालीद्वारे संचालित असून अभियांत्रिकीसारख्या उच्च व्यावसायिक शिक्षणार्थी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वाचानाद्वारे ज्ञान आणि माहिती मिळवण्याचे अतिशय महत्वाची केंद्रीभूत संसाधन आहे. सदर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ग्रंथालय विभागातील सर्वच सहय्यक ग्रंथपाल एन डी राठोड, दीपा गुजराथी, कविता पाटील यांनी परिश्रम घेतले.
‘वाचन प्रेरणा दिवस’ उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शिरपूर एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ अमरिशभाई पटेल, माजी नगराध्यक्षा व संचालक जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संचालक चिंतनभाई पटेल, सचिव रेषा पटेल, संचालक अतुल भंडारी, महाविद्यालयाचे संचालक डॉ जे बी पाटील, उपसंचालक डॉ पी जे देवरे, परीक्षा नियंत्रक प्रा सुहास शुक्ल, विभाग प्रमुख डॉ व्ही एस पाटील, प्रा पी एल सरोदे, प्रा जी व्ही तपकिरे, डॉ एस व्ही देसले, डॉ आर बी वाघ, डॉ डी आर पाटील, डॉ उज्वला पाटील, डॉ एस ए पाटील, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा एम पी जैन, जनसंपर्क अधिकारी डॉ प्रशांत महाजन तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आनंद व्यक्त केला.