महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात क्रातिसिंह नाना पाटील जयंती साजरी
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

या प्रसंगी उपकुलसचिव डॉ. संजय नेरकर यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कार्याची माहिती दिली. याप्रसंगी डॉ. मनोजकुमार मोरे, डॉ. उदयसिंह रावराणे, श्री. ए.के. सोनवणे, श्री. बाळासाहेब पेंढारकर, श्री. वाय.जी. पाटील, श्री. नितीन काळे, श्री. जी.ए.फटांगरे, श्री. दिपक चव्हाण, श्री. प्रशांत पवार, श्री. सचिन बोरसे, श्री. प्रविण सोनार, श्री. राहूल विभांडिक, श्रीमती उज्वला पवार, श्रीमती मीना अग्निहोत्री, श्री. मनोज वाटाणे, श्री. किशोर गांगुर्डे, श्री. सचिन जोशी, श्री. शांताराम गुंजाळ, श्री. दिलीप राजपूत आदी कर्मचारी उपस्थित होते.