नागपूर विद्यापीठाचा फेन्सिंग संघ जम्मू येथील अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत होणार सहभागी
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या फेन्सिंग (महिला व पुरुष) संघाची घोषणा क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ संचालक डॉ विशाखा जोशी यांनी केली आहे. जम्मू येथील जम्मू विद्यापीठात ६ ते १० नोव्हेंबर २०२४ दरम्यान आयोजित अखिल भारतीय फेन्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत विद्यापीठाचा संघ सहभागी होणार आहे.
महिला संघ –
आरएस मुंडले महाविद्यालयातील हर्षदा दमकोंडवार, जेएम पटेल महाविद्यालय भंडारा येथील मंजिरी तांबे, नंदिनी राहाकडे, भिवापूर महाविद्यालयातील हिमानी घोडमारे, निलोफर पठाण व तनु डोमधरे, नाशिकराव इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूर येथील सई राजपूत, एसपी कॉलेज गोंदिया येथील मेघा गिरडकर, डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय नागपूर येथील श्रुती जोशी, जीएस महाविद्यालय नागपूर येथील वेदिका कुंभलकर, रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील दिशा शर्मा, ज्योतिबा शारीरिक शिक्षण महाविद्यालय नागपूर येथील सोनाली तर राखीव खेळाडूंमध्ये एलईडी महिला महाविद्यालयाची अंजुम शेख, अंजुमन अभियांत्रिकी महाविद्यालयाची इलहन अख्तर, प्रियदर्शनी महिला महाविद्यालय वर्धा येथील साक्षी बोरसरे व अंजुमन महिला महाविद्यालयातील इसरत पठाण यांचा समावेश आहे.
पुरुष संघ –
जेएम पटेल महाविद्यालय भंडारा येथील जय भोयर, तन्मय लांजेवार व रोहित वाकेकर, भिवापूर महाविद्यालयातील भूषण नागोसे, चेतन वाकेकर व प्रीतम हलदर, बॅरि शेषराव वानखेडे शिक्षण महाविद्यालयातील जीवनदीप क्षीरसागर, प्रियदर्शिनी महाविद्यालयातील पंकज चन्नोर, इंदुताई मेमोरियल कॉलेज पिईडी नागपूर येथील आयुष साहू, केआयटीएस कॉलेज रामटेक येथील तेजस कुरंजेकर, रामकृष्ण वाघ महाविद्यालय बोखारा येथील पारस मांडवकर, महात्मा गांधी कॉलेज पाठशिवणी येथील मयूर निमजे यांचा तर राखीव खेळाडूंमध्ये जेएम पटेल कॉलेज भंडारा येथील प्रणय मुळे, भिवापूर महाविद्यालय भिवापूर येथील निखिल कोहाड, जीएस कॉलेज वर्धा येथील विष्णू वाडे तर अंजुमन अभियांत्रिकी महाविद्यालयातील काझी मोहम्मद अकताब जफर यांचा समावेश आहे.