पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात स्वातंत्र्य सेनानी बाबुरावजी काळे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विशेष व्याख्यान संपन्न

स्वातंत्र्यसेनानी स्व बाबुरावजी काळे यांचे कार्य मराठवाड्याच्या विकासात दिशादर्शक : दिनेश हारे

छत्रपती संभाजीनगर : अजिंठा शिक्षण संस्था संचलित पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात, अजिंठा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी माजी मंत्री तथा खासदार कै बाबुरावजी काळे (आप्पासाहेब) यांच्या 39 या पुण्यस्मरण दिनानिमित्त विशेष व्याख्यानाच्या प्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून, ‘मराठवाड्यातील विकासाच्या संधी ‘ या विषयावर बोलताना दिनेश हारे (संपादक दै गांवकरी ) यांनी कै बाबुरावजी काळे यांचा जीवनपट हाच मराठवाड्याच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट होय असे प्रतिपादन केले.

पुढे बोलताना ते म्हणाले की मराठवाड्याचा विकास हा स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये औद्योगिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात आरोग्य व दळणवळणाच्या क्षेत्रात झपाट्याने झालेला असून. कृषी क्षेत्र सिंचाई यामध्येही मराठवाड्याने मोठ्या प्रमाणावर विकास केल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. या विकासात मराठवाड्यातील थोर स्वातंत्र्य सेनानी व लोकप्रतिनिधींचे भरीव स्वरूपाचे योगदान राहिले असल्याचेही ते म्हणाले.

Advertisement

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय मून यांनी केले याप्रसंगी बोलताना मराठवाड्याचा विकास हा कै बाबुरावजी काळे यांचे चरित्र हीच मराठवाड्याच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट आहे, मराठवाड्याच्या विकासात भूविकास बँक, सूतगिरणी यासारख्या त्यांच्या भविष्यातील योजनांमुळे मराठवाड्याच्या विकासाचा 25 वर्षाचा एक आराखडा त्यांच्या या कार्याने झाल्याचे आपणास दिसून येते असे म्हणाले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अजिंठा शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाशदादा काळे हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भाऊराव थोरात (आमदार पैठण) यांनीही आपले याप्रसंगी मनोगत व्यक्त केले व बाबुरावजी काळे आणि आपले संबंध अतिशय मैत्रीचे तसेच राजकारणात जरी पक्ष वेगळे असले तरी राजकीय मैत्री ही होती असे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ भाऊसाहेब गाडेकर यांनी केले. याप्रसंगी त्यांनी बाबुरावजी काळे यांच्या जीवनपटाचे वाचन केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ एस आर मंझायांनी मानले तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचा सांस्कृतिक विभाग यांनी मेहनत घेतली.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page