मिल्लीया महाविद्यालयात यौम-ए- सर सय्यद कार्यक्रम संपन्न
बीड : मिल्लीया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात उर्दू विभाग व लिटररी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने यौम-ए- सर सय्यद (Yaum -e- Sir Sayyed) कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मोहम्मद इलयास फाजील होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा सूत्रसंचालन प्राध्यापिका डॉ काझी अर्शिया जबीन यांनी केले. यावेळी कार्यक्रमात सर सय्यद अहमद खान यांच्या बद्दल माहिती दिली.

सर सय्यद अहमद खान यांचा जन्म 17 ऑक्टोंबर 1817 रोजी दिल्ली येथे झाला. ते एक लेखक, शिक्षक व न्यायशास्त्रज्ञ होते, सर सय्यद अहमद खान एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते. सर सय्यद अहमद खान हे 19 व्या शतकातील एक भारतीय शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक होत. भारतातील मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करून त्यांचा सामाजिक विकास साधण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते.
सर सय्यद यांनी मोहमेडन अँग्लो-ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली ज्याला त्यांच्या मृत्यूनंतर इ स 1920 मध्ये अलिगढ मुस्लिम विद्यापीठ म्हणून विद्यापिठाचा दर्जा देण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना सर सय्यद अहमद खान डॉक्युमेंटरी व्हिडिओ दाखविण्यात आला.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ मोहम्मद नासेर बागवान यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ सय्यद हनिफ, प्रोफेसर हुसैनी एसएस, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ अब्दुल अनीस, प्राध्यापिका डॉ फर्रा फातेमा नेहरी, अरेबिक विभाग प्रमुख प्रोफेसर अब्दुल समद, प्रा मुजम्मिल फारुकी, विद्यार्थी विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती.