मानाच्या माजी राज्यपाल पी सी अलेक्झांडर मराठी वक्तृत्व स्पर्धेत अमरावती विद्यापीठाला प्रथम बक्षीस
कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांच्या हस्ते सत्कार
अमरावती : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे आयोजित मानाची माजी राज्यपाल पी सी अलेक्झांडर आंतर विद्यापीठ मराठी वक्तृत्व स्पर्धेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाला प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झाले.
सदर स्पर्धा 10 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेमध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची विद्यार्थिनी श्रावणी रोटे हिने प्रथम क्रमांक पटकाविला. श्रावणी ही अमरावती शहरातील सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून तिचे इंग्रजी, मराठी व हिंदी या तिन्ही भाषेवर लीलया प्रभुत्व आहे. श्रावणीच्या या घवघवीत यशाबद्दल कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते यांनी तिचा सत्कार केला. यावेळी कुलसचिव डॉ अविनाश असनारे, विद्यार्थी विकास संचालक डॉ राजीव बोरकर उपस्थित होते.