सौ.के.एस.के. महाविद्यालयात युवा संवाद कार्यक्रम उत्साहात संपन्न

विद्यार्थ्यांनी भविष्यात काय व्हायचे याचा  विचार करावा  – जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे


बीड :   येथील सौ.केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला विज्ञान व वाणिज्य  महाविद्यालयात  1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट 2023 कालावधीत तहसिल कार्यालय बीडच्या वतीने  महसुल सप्ताह अंतर्गत  युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये मतदान नोंदणी,उत्पन्न प्रमाणपत्र, आधारकार्ड  अपटेड  करणे आदि विद्यार्थ्यांना लागणार्‍या  विविध कागदपत्रांचे व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांना मार्गदर्शन करत असताना तुमचे वय हे आता समजण्याजोगे झाले असून तुम्ही आता आपल्या भविष्याचा विचार करू शकता, तुम्ही आता लहान राहिला नाहीत तर भविष्यात तुम्हाला काय व्हायचे आहे याचा विचार तुम्ही करू शकता आता तुम्ही सज्ञान आहात तुम्हाला जे क्षेत्र आवडते आहे त्या क्षेत्रात तुम्ही स्वतःला झोकून देऊन त्याचा सतत पाठपुरावा करत राहिल पाहिजे तर ध्येय निश्चिती पूर्ण होते.तुम्ही  सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे. स्पर्धा परिक्षेसाठी तुम्हाला वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी तुम्ही वाचन केले पाहिजे. व मोबाईलचा वापर कमीत कमी  केला पाहिजे.मोबाईलला आपल्यावर हाबी होऊ देऊ नका व सर्व विद्यार्थ्यांना पुढील आयुष्य व शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

Advertisement
 The youth dialogue program in Mrs. KSK  COLLEGE  was completed with collector


यानंतर संस्थेच्या उपाध्यक्ष प्राचार्य डॉ.दीपा क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील स्पर्धा परिक्षेकरिता उपलब्ध असलेल्या विविध मासिके,वर्तमानपत्र,ई लायब्रररीचा वापर करावा तसेच विद्यार्थिंनींनी स्वतःचे काम स्वतच करावे.पालकावर अवलंबून  न राहाता स्वतःस्वावलंबी बनावे.यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे या सुध्दा एक महिला असून त्यांचा एक आदर्श घ्यावा.व विद्यार्थ्यांसाठी लागणार्‍या विविध शासकीय योजनांची माहिती पुस्तीका तयार करून विद्यार्थिनी, महिलांसाठी  व विद्यार्थ्यांना माहितीस्तव देण्यात यावी असे नमूद केले. या युवा संवाद कार्यक्रमाच्य निमित्ताने महसुल कार्यालयातील  कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांसाठी सेतुचे तीन कार्यालय (बुथ) आधार आपरेटरचे एक कार्यालयात दिवसभर महाविद्यालयात सुरू ठेवले व विविध प्रमाणपत्रांचे वितरण केले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसिलदार नरेंद्र कुलकर्णी तर  कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.शरद पवार तर तहसिलदार श्री.सुरेंद्र डोके यांनी मानले.
यावेळी कार्यक्रमासाठी तहसिलदार सुरेंद्र डोके, तहसिलदार महसूल श्री.नरेंद्र कुलकर्णी तसेच   महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवानंद क्षीरसागर, उपप्राचार्य डॉ.संजय पाटील देवळाणकर,उपप्राचार्य डॉ्र.शिवाजी शिंदे,पदव्युत्तर संचालक डॉ.सतीश माऊलगे,कमवि उपप्राचार्य डॉ.एन.आर.काकडे,पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर,कार्यालयीन अधिक्षक डॉ.विश्वांभर देशमाने तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी,विद्यार्थिनी उपस्थित होते. तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page