सोलापूर वि‌द्यापीठ व क्वीक हिल फौंडेशनच्या “निसर्गपूरक आणि सायबर संरक्षित परिसर” उपक्रमासाठी सामंजस्य करार

सोलापूर : आजच्या युगात तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबतच सोलापूर वि‌द्यापीठ देखील नवी दिशा घेत आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे निसर्गपूरक आणि सायबर संरक्षित कॅम्पस. या संकल्पनेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ पर्यावरण संवर्धन आणि सुरक्षितता यांचा मेळ साधत आहेत. या उपक्रमासाठी सोलापूर विद्यापीठ व क्वीक हिल फौंडेशन यांच्यामध्ये सामंजस्य करार झालेला आहे.

सौर उर्जेचा वापर, पावसाच्या पाण्याचे संचयन, हरित क्षेत्रांची वाढ आणि प्लास्टिक मुक्त परिसर ही काही निसर्गपूरक तत्वे आहेत. वि‌द्यार्थ्यांना व समाजाला पर्यावरणाचे महत्त्व समजून देणे आवश्यक आहे. वृक्षारोपण, शाश्वत ऊर्जेचा वापर, कचऱ्याचे व्यवस्थापन यामुळे परिसर अधिक स्वच्छ आणि आरोग्यपूर्ण बनतो. तसेच पाण्याचे नियोजनबद्ध वापर हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे नवीन युगात डिजिटल शिक्षणाचा वेगाने प्रसार होत आहे, मात्र त्यासोबत सायबर धोकेही वाढत आहेत. त्यामुळे समाजामध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. सायबर सुरक्षेची जागरूकता निर्माण करण्यासाठी क्वीक हिल फौंडेशन सतत विविध कार्यक्रम राबवित असते. क्वीक हिल फौंडेशनने संगणक शास्त्र संकुलातील निवडलेल्या सायबर वॉरियर्सनी निसर्ग व सायबर सुरक्षा यांच्यामध्ये पोस्टर्स‌द्वारे सांगड घालण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. नमुन्यादाखल खाली काही पोस्टर्समधील वाक्ये दिली आहेत,

Advertisement
  • निसर्ग जसा आपल्या इकोसिस्टिमचे रक्षण करतो तसाच तुमचा डेटा संरक्षित करा.
  • तुमच्या डेटाचे रक्षण करा, जसे झाडे पृथ्वीचे रक्षण करतात. झाडे व पासवर्ड दोन्ही संरक्षित केले पाहिजेत.
  • OTP प्रमाणे निसर्गाला देखील वेळेत जपा. निसर्गासारखा, तुमचा OTP ही असतो अनमोल.
  • OTP वेळेत वापरा, निसर्ग वेळेत वाचवा.
  • जसा पाण्याचा अपव्यय नको, तसाच पासवर्डचा दुरुपयोगही नको.

पाणी आणि पासवर्ड दोन्ही जपून वापरा.यासारखे विविध संदेश देणारे संगणकशास्त्र संकुलातील सायबर वॉरियर्सनी पोस्टर्स तयार केले व वि‌द्यापीठ परिसरातील दर्शनी भागात विविध झाडांवर हे पोस्टर्स प्रदर्शित केलेले आहेत.

या पोस्टर प्रदर्शनाचे उदघाट्न वि‌द्यापीठाचे कुलगुरु प्रा प्रकाश महानवर यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी प्र-कुलगुरु प्रा लक्ष्मीकांत दामा, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य चिलवंत व कुलसचिव योगिनी घारे उपस्थित होते. या उपक्रमासाठी संगणकशास्त्र संकुलाचे संचालक डॉ राजीवकुमार मॅते, डॉ अशोक शिंदे, डॉ एस डी राऊत, सुधीर वाघमारे व संदीप पोटे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page