सौ के एस के महाविद्यालयात ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
बीड : सौ एस के महाविद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शुभम कांतागळे, नवगण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा किशोर काळे, संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ दीपाताई क्षीरसागर व यांच्या हस्ते स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ७८ वा स्वातंत्र्य दिन ध्वजा रोहन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने एनसीसी च्या कॅडेट मानवंदना दिली. या वेळी महाविद्यालयाच्या विविध विभागातंर्गत भित्ती पत्रकाचे प्रकाशन झाले. त्यात मराठी विभाग, हिंदी, इतिहास, प्राणीशास्त्र, गणित विभाग, संगणकशास्त्र विभाग, संगीत विभाग, रसायनशास्त्र विभाग, अर्थशास्त्र विभाग, गृहशास्त्र, वनस्पतीशास्त्र, सुक्ष्मजिवशास्त्र, नाटयशास्त्र, भौतिकशास्त्र, भूगोल, राज्यशास्त्र आदी विभागाच्या वतीने भित्तीपत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजावंदना नंतर आरोग्य जागृतीपर नाटशास्त्र विभागाच्या वतीने पथनाट्य सादर करण्यात आले.
या कार्यक्रमास, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर, उपप्राचार्य डॉ संजय पाटील देवळाणकर, संस्था प्रशासक डॉ सुधाकर गुट्टे, डॉ विश्वांभर देशमाने, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ खान अन्सारउल्ला शफिउल्ला, कमवि उपप्राचार्य डॉ नारायण काकडे, पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर, एनसीसी कॅडेट, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, कार्यक्रमाधिकारी डॉ राठोड बी जे, तसेच डॉ आर टी गर्जे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ बळीराम राख यांनी केले.