सौ के एस के महाविद्यालयात ६६ वा विद्यापीठ वर्धापन दिन साजरा

बीड : सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात 23 ऑगस्ट 2024 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 66 वा वर्धापनदिन प्राचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वजाचे ध्वजारोहन नंतर संगीत विभागाच्या वतीने विद्यापीठ गीत गाऊन विद्यापीठ वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे प्रतिनिधी डॉ सुधाकर गुट्टे, डॉ विश्वांभर देशमाने, उपप्राचार्य डॉ संजय पाटील देवळाणकर, पदव्युत्तर संचालक डॉ ए एस खान, कमवि उपप्राचार्य एन आर काकडे, पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर, यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी तसेच एनसीसी कॅप्टन डॉ बालासाहेब पोटे व त्यांच्या सर्व कॅडेटनी सहभाग घेतला तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ राठोड बी जे व रासेयोचे सर्व स्वयंसेवक यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com