सौ.के.एस.के.महाविद्यालयात  65 वा  विद्यापीठ वर्धापन दिन साजरा

65th  DrB AMU Anniversary Celebration at Mrs. KSK College Beed


बीड : सौ.केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात 23 ऑगस्ट 2023 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 65 वा वर्धापनदिन प्राचार्य डॉ.शिवानंद क्षीरसागर यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वजाचे ध्वजारोहन नंतर  संगीत विभागाच्या वतीने विद्यापीठ गीत गाऊन विद्यापीठ वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.संजय पाटील देवळाणकर,उप प्राचार्य डॉ.शिवाजी शिंदे पदव्युत्तर संचालक डॉ.सतीश माऊलगे,कमवि उपप्राचार्य एन.आर.काकडे , पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर, डॉ.सुधाकर गुट्टे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी तसेच एनसीसी  कॅप्टन डॉ.बालासाहेब पोटे व त्यांच्या सर्व कॅडेटनी सहभाग घेतला तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ.खाकरे पी.आर.व रासेयोचे सर्व स्वयंसेवक यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *