डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६५ वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा
कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते ध्वजारोहण
औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६५ वा वर्धापनदिन बुधवारी (दि.२३) विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. मुख्य इमारतीसमोरील हिरवळीवर मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वज फडकविण्यात आला. यावेळी प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांची प्रमुख उपस्थिती होती. मराठवाडयातील कष्टकरी, वंचित व शेतकरी यांच्या मुलांसाठी विद्यापीठ असावे, या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नाची पुर्तता २३ ऑगस्ट रोजी झाली. ६५ वर्षात विद्यापीठाने प्रगती केल्याचा गौरवपर्वूक उल्लेख कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी केला. तसेच कुलपती नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.गजानन सानप, काशिनाथ देवधर, डॉ.अकुंश कदम, डॉ.रविकिरण सावंत, डॉ.योगिता पाटील, यांच्यासह अधिष्ठाता डॉ.भालचंद्र वायकर, डॉ.वाल्मिक सरवदे, डॉ.प्रशांत अमृतकर, डॉ.चेतना सोनकांबळे, डॉ.मुस्तजिब खान, प्रदीपकुमार देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. सुरक्षा अधिकारी बाळु इंगळे यांनी सोहळयाचे संचालन केले. यावेळी शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.