राजकारणातील ‘मूलभूत संकल्पना’ वर ५ दिवसीय कार्यशाळा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचा उपक्रम

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभाग (स्वायत्त) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, दिक्षाभूमी नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने “राजकारणातील मुलभूत संकल्पना” या विषयावर ५ दिवसीय उन्हाळी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा सोमवार ९ जूनपासून शुक्रवार १३ जून २०२५ पर्यंत चालणार आहे.

कार्यशाळेचे उद्घाटन ९ जून रोजी संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विकास जांभुळकर होते. माननीय प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विद्या चोरपगार उपस्थित होत्या.

Advertisement

प्रा. सचिन चापके यांनी प्रास्ताविक सादर केले. कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी ‘राज्य’ या संकल्पनेवर संवाद सत्र व गटचर्चा घडवून आणण्यात आल्या. सहभागी विद्यार्थ्यांच्या अभिप्रायाची नोंद घेण्यात आली. या कार्यशाळेत नागपूरमधील विविध महाविद्यालयांतील आणि शाखांतील विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

प्रथम सत्राचे संचालन डॉ. विकास जांभुळकर यांनी केले. कार्यशाळेचे समन्वयन व नियोजन डॉ. विद्या चोरपगार, डॉ. अतुल मुन, डॉ. रायन महाजन, प्रा. प्रज्ञानंद माटे आणि प्रा. सचिन चापके यांनी केले.

ही कार्यशाळा विद्यार्थ्यांना राजकारणातील मूलभूत तत्त्वे समजून घेण्यासाठी आणि नव्या दृष्टीकोनातून विचार करण्याची संधी उपलब्ध करून देणारी ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *