१२७ प्राध्यापकांच्या जागांसाठी ’शिक्षक पात्रता चाचणी’स ३०० उमेदवारांची उपस्थिती
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध विभागात कंत्राटी प्राध्यापक भरतीसाठी दोन दिवस चाचणी
तीन केंद्रावर झाली ऑनलाईन चाचणी
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध विभागात प्राध्यापकांच्या १२७ जागा कंत्राटी पध्दतीने भरण्यात येणार आहेत. या जागांसाठी रविवारी (दि १४) घेण्यात आलेल्या ’शिक्षक पात्रता चाचणी’स (टीईटी) ३०० उमेदवारांची उपस्थिती होती, अशी माहिती कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांनी दिली.
विद्यापीठाचा मुख्य परिसर, उपपरिसर, पैठण येथील संतपीठातील ६४ विषयांसाठी प्राध्यापकांच्या १२७ जागा काढण्यात आल्या आहेत. कुलगुरु डॉ विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली ७ जुलै रोजी झालेल्या बैठकीत विविध विभागाच्या १२७ जागा कत्राटी पध्दतीने भरण्यास मान्यता दिली. २४ हजाराहून ३२ हजार एकत्रित वेतन देण्यास मान्यता यावेळी मान्यता देण्यात आली. यानूसार ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले. एकूण १२७९ ऑनलाईन अर्ज तर ८९७ हार्ड कॉपी जमा झाल्या. यातील ७३४ अर्ज वैध तर १६३ अवैध ठरले. अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची रविवारी व सोमवारी (दि १४ व १५ जुलै) विद्यापीठ परिसरात ऑनलाइन पद्धतीने लेखी परीक्षा घेण्यात येत आहे.
तीन केंद्रावर ऑनलाईन चाचणी
विद्यापीठ ग्रंथालय, व्यवस्थापन शास्त्र विभाग व संगणकशास्त्र विभागात रविवार व सोमवार या दोन दिवशी चाचणी घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी दिड तांसाचा अवधी असून ८० गुणासाठी ८० प्रश्न विचारण्यात आले. ’निगेटिव्ह मार्किंग’ ठेवण्यात आली आहे. सकाळी १०:०० ते सायंकाळी ०७ः३० या वेळेत शिफ्टनिहाय ही चाचणी घेण्यात आली. पहिल्या दिवशी पाच सत्रात एकूण ६४ पैकी ३७ विषयांसाठी परीक्षा घेण्यात आली . या परीक्षेत ५१५ पैकी तीनशे जण उपस्थित होते. तर दुसऱ्या दिवशी २७ विषयांसाठी २१९ जण टीईटी देणार आहेत वरील तिन्ही विभागात सकाळी ११:०० ते दुपारी ०३:३० या दरम्यान
ही चाचणी होणार आहे .
आस्थापना विभागाचे उपकुलसचिव डॉ गणेश मंझा, ’युनिक’चे संचालक डॉ प्रवीण यन्नावार, कक्षाधिकारी आर आर चव्हाण व सर्व सहकारी प्राध्यापक, प्रोग्रामर, कर्मचारी यांनी यासाठी प्रयत्न केले.