डॉ डी वाय पाटील पॉलिटेक्निकच्या २७ विद्यार्थ्यांची बजाज ऑटो लिमिटेडच्या परिसर मुलाखतीत निवड
कसबा बावडा : डॉ डी वाय पाटील पॉलिटेक्निक कॅम्पस इंटरव्यूमध्ये आयसीआरई गारगोटी, डॉ बापूजी साळुंखे पॉलिटेक्निक तसेच ए डी शिंदे पॉलिटेक्निक गडहिंग्लज येथील विद्यार्थी विद्यार्थिनींनी भाग घेतला. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स शाखेतील विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या या कॅम्पस ड्राईव्हमधून २७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यावेळी बजाज कंपनीसंबंधी माहिती देण्यासाठी सी एस कोरे उपस्थित होते, तसेच विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या.
प्राचार्य डॉ महादेव नरके यांनी सांगितले की, बजाज कंपनीच्या कॅम्पस इंटरव्यूमुळे विद्यार्थ्यांना नोकरीच्या सुवर्णसंधी प्राप्त होणार आहेत. चांगले टेक्निकल ज्ञान, सॉफ्ट स्किल्स आणि आत्मविश्वास या जोरावर विद्यार्थी नक्कीच जॉब मिळवू शकतात.
डी वाय पाटील पॉलिटेक्निक संस्थेच्या वतीने विविध कंपन्यांच्या कॅम्पस इंटरव्यूसाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. तसेच विद्यार्थ्यांना मुलाखतीची तयारी करण्यासाठी विशेष प्रशिक्षणही दिले जात असल्याचे डॉ नरके यांनी सांगितले.
निवड झालेल्या २७ विद्यार्थ्यांना जॉब ऑफर लेटर दिले गेले. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा अजय बंगडे, प्रा अर्जुन पाटील, प्रा गौरी कदम आणि प्रा संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात या कॅम्पस ड्राईव्हचे नियोजन करण्यात आले.
कार्यक्रमास उपप्राचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार महेश रेणके, डॉ पी के शिंदे आणि प्रा एस बी शिंदे यांची उपस्थिती होती.