महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 23 वा दीक्षांत समारंभ शुक्रवारी

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 23 वा दीक्षान्त समारंभ शुक्रवार, दि. 23 फेब्रुवारी 2024 रोजी नाशिक येथे विद्यापीठ मुख्यालयात आयोजित करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प. यांनी सांगितले की, विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री नामदार हसन मुश्रीफ तसेच बेळगांवचे के.एल.ई. अॅकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अॅण्ड रिसर्चचे कुलगुरु डॉ. नितीन गंगने हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, दीक्षात समारंभाचे आयोजन विद्यापीठ आवारातील शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीत सकाळी 11.00 वाजता करण्यात आले आहे. विद्यापीठाचे प्राधिकरण सदस्य, संलग्नित महाविद्यालय, शिक्षक, विद्यार्थी, पालक व अभ्यागतांनी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाची नोंद घ्यावी. विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात डॉ. ख्रिस्टोफर डिसूजा यांना आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डी.लिट् ही विद्यापीठाची विशेष समान्य पदवी प्रदान करण्यात येणार आहे. डॉ. ख्रिस्तोफर डिसूजा यांनी मुंबई विद्यापीठातून ऑटोरहिनोलॅरिन्गोलॉजीमध्ये (कर्ण व स्वरयंत्र शास्त्र) डिप्लोमा आणि शस्त्रक्रियेमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. 1992 मध्ये त्यांनी नॅशनल बोर्ड ऑफ ऑटोरहिनोलॅरिंगोलॉजी देखील उत्तीर्ण केली. 1994 मध्ये एओलस सायंटिफिक प्रेसने त्यांना हॉलंड, युरोपमधील ऑर्बिटल रोगांच्या क्षेत्रातील कामगिरीबद्दल ऑर्बिट आंतरराष्ट्रीय रौप्य पदक प्रदान केले. असा विशेष सन्मान मिळवणारे ते पहिले भारतीय आहेत. याव्यतिरिक्त, त्यांची सहा प्रकाशने आहेत जी आंतरराष्ट्रीय समवयस्क-पुनरावलोकन जर्नल्समध्ये प्रकाशित झाली आहेत आणि त्यांना महत्त्वपूर्ण कार्य म्हणून ओळखले जाते. ओटोस्क्लेरोसिसवरील संशोधन कार्यामुळे त्यांना राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे.

Advertisement

डॉ. ख्रिस्तोफर डिसूजा यांनी लिहिलेल्या आणि संपादित केलेल्या साथीच्या रोगावरील दोन जागतिक पाठ्यपुस्तकांना आंतरराष्ट्रीय प्रशंसा मिळाली आहे. कर्णबधिर मुलांना त्यांचे ऐकू येण्यास मदत करण्यासाठी त्यांच्या आंतरराष्ट्रीय पाठ्यपुस्तकाची जागतिक स्तरावर प्रशंसा आहे. डॉ. क्रिस्टोफर डिसूजा यांनी श्रवणशक्तीची अनमोल देणगी देऊन गरीब आणि उपेक्षित मुलांना मदत करून मानवतेसाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे. कर्णबधिर मुले आणि त्यांच्या कुटुंबीयांना या प्रक्रियेत मदत करण्याच्या ध्येयासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले आहे. या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांनादेखील पदवी प्रदान करण्यात येणार आहे. विविध विद्याशाखांच्या पदवीका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासियता पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र व गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात येणार आहे. या दीक्षांत समारंभाचे https://youtube.com/live/aUjwAqGcwMo?feature=share यु-टयुब चॅनेवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. दीक्षांत समारंभाच्या ऑनलाईन प्रक्षेपणास मोठया प्रमाणात विद्यार्थी, शिक्षक, पालक व अभ्यागत उपस्थित रहावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page