देवगिरी सिव्हिल इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांना “क्रिएट” स्पर्धेत रु 50,000/- चे प्रथम पारितोषिक
छत्रपती संभाजीनगर : जालना येथील प्रसिध्द स्टिल कंपनी कालिका तर्फे आयोजित “क्रिएट” या नाविण्यपुर्ण स्पर्धेमध्ये देवगिरी अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाच्य विद्यार्थ्यांनी प्रथम पारितोषिक पटकावले आहे. या स्पर्धेमध्ये सिव्हिल इंजिनिअरींग विभागाच्या तृतीय वर्षातील प्रीती खंडागळे, शेख शोएब, शेख उस्मान, जोशवा बोवर या विद्यार्थ्यांनी रु. 50,000/- चे प्रथम पारितोषिक पटकावले.
सदर स्पर्धेचा मुळ उद्देश युनाएटेड नेशन्सने डिफाईन केलेले Sustainable Development Goal चे स्टिलनिर्मिती मॉडेल्सचे प्रदर्शन करणे असा होता. ही स्पर्धा दोन टप्प्यात घेण्यात आली. पहिल्या टप्प्यात व्हिडीओव्दारे स्टिल मॉडेलची माहिती देण्यात आली व दुसऱ्या टप्प्याचे आयोजन दि 11 मे 2024 रोजी कालिका स्टील कंपनीच्या प्रांगणात करण्यात आले होते, दुसऱ्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेले नाविण्यपुर्ण स्टिल सळयांमध्ये बनवलेले मॉडेर्ल्सचे सादरीकरण करण्यात आले या स्पर्धेमध्ये छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्हातील अभियांत्रिकी महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला.
यशस्वी विद्यार्थाचे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आ प्रकाशदादा सोळुंके, सचिव आ सतीश चव्हाण, उपाध्यक्ष शेख सलीम शेख अहमद, कोषाध्यक्ष किरण आवरगावकर, कार्यकारीणी सदस्य विश्वास येळीकर, प्रदीप चव्हाण, महाविद्यालयाचे प्रभारी संचालक डॉ सुभाष लहाने, विभागप्रमुख डॉ गजेंद्र गंधे, डॉ सत्यवान धोंडगे, प्रा संजय कल्याणकर, डॉ राजेश औटी, डॉ सचिन बोरसे, डॉ शोएब शेख, डॉ रुपेश रेब्बा, प्रा अमरसिंह माळी यांनी अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना विभागप्रमुख डॉ गजेंद्र गंधे, डॉ दुर्गेश तुपे, डॉ सुनिल शिंदे व प्रा कविश पटवारी यांचे मार्गदर्शन लाभले.