डीवायपी साळोखेनगरच्या १७ विद्यार्थ्यांची डीएचडी इन्फ्राकॉन कंपनीत निवड
३ लाख वार्षिक पॅकेजसह अंतिम वर्षातच मोठी कामगिरी
साळोखेनगर : डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीरिंग, साळोखेनगर येथील स्थापत्य अभियांत्रिकीच्या १७ विद्यार्थ्यांची देशातील पायाभूत सुविधा क्षेत्रातील अग्रगण्य डीएचडी इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड या नामवंत कंपनीत निवड झाली आहे. अंतिम वर्षाच्या पहिल्याच सेमिस्टरमध्ये मिळालेल्या या संधीमुळे विद्यार्थ्यांना ३ लाख रुपये वार्षिक पॅकेज मिळणार आहे.
डीएचडी इन्फ्राकॉन ही रस्ते बांधकाम, महामार्ग प्रकल्प, पूल बांधकाम आणि नागरी पायाभूत सुविधा विकास या क्षेत्रातील एक प्रतिष्ठित कंपनी आहे.

कॅम्पस संचालक डॉ. अभिजीत माने म्हणाले,
“ही निवड आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. महाविद्यालयात गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर विशेष भर दिला जातो. मुलाखत प्रशिक्षण, विविध स्पर्धा परीक्षा तयारीमुळे विद्यार्थ्यांना चांगल्या प्लेसमेंट संधी मिळत आहेत.”
प्राचार्य डॉ. सुरेश माने यांनी सांगितले,
“इंडस्ट्रियल व्हिजिट्स, गेस्ट लेक्चर्स, हँड्स-ऑन ट्रेनिंग आणि वर्कशॉप्समुळे विद्यार्थ्यांच्या औद्योगिक कौशल्यांचा विकास होतो आणि करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध होतात.”
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आ. सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, तेजस पाटील, देवश्री पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, तसेच महाविद्यालयाचे अधिकारी, विभाग प्रमुख डॉ. अभिजीत पाटील आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी प्रा. प्रीती भोसले यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
