महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात शहिद अंशुमन सिंह यांना श्रध्दांजली
नाशिक : भारतीय सैन्यदलातील कॅप्टन अंशुमन सिंह हे बुधवार, दि. 19 जुलै 2023 रोजी सियाचिन येथे झालेल्या दुर्घटनेत शहिद झाले, त्यांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे भावपूर्ण श्रध्दांजली देण्यात आली. या कार्यक्रमास विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प, समवेत प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी एन.व्ही.कळसकर एमपीजीआयचे अधिष्ठाता डॉ. सुशिलकुमार झा आदी अधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, शहिद कॅप्टन अंशुमन सिंह हे आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी विद्यार्थी होते. आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज येथे त्यांनी वैद्यकीय पदवी संपादन केली. सियाचिनसारख्या दुर्गम भागात कर्तव्य बजावत असतांना बंकरमधील आगीच्या दुदर्वी घटनेत सहकारी यांना वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांनी बलिदान दिले, त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या शौर्याला आणि देशभक्तीला सलाम, असे त्यांनी सांगितले. विद्यापीठातील विशेष कार्य अधिकारी कर्नल डॉ. वरुण माथूर यांनी शहिद कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या कार्याची आणि कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या कामगिरीबद्दल सियाचिन परिसरातील आव्हानांबद्ल माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केेले. दोन मिनिट स्तब्ध उभे राहून विद्यापीठ परिवारातर्फे शहिद कॅप्टन अंशुमन सिंह यांना भावपूर्ण श्रध्दांजली देण्यात आली. या कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.