नीट परीक्षा कशी असते ?
नीट परीक्षा कशी असते ?
March 10, 2022 Sunil Rajput 0 View 0 Comments AYUSH admission, fees, MBBS Admission, Medical Admission, Medical Students, neet 2022, NEET exam 2022 detail in marathi, NEET exam Structure, NTA, ReservationEdit
Spread the love
वैद्यकिय शिक्षण घेण्यासाठी देशभरात नीट परीक्षा द्यावी लागते. तसेच परीक्षा पात्र झाल्यावरच श्रेणी नुसार वैद्यकिय शाखेत प्रवेश मिळतो. नीट ( NEET ) या इंग्रजी शब्दाचे विस्तारित रूप पुढीलप्रमाणे आहे. NEET – NATIONAL ELIGIBILITY CUM ENTRANCE TEST असे आहे. NEET 2022 exam detail in marathi पण आपण इतिहास बघितला तर असे लक्षात येते की वैद्यकिय शिक्षण प्रवेश घेण्यासाठी प्रत्येक राज्य स्वतः राज्य सामाईक परीक्षा CET घेत असत, तरच देश भारतील विविध वैद्यकिय शिक्षण देणाऱ्या संस्था ही त्याच्या पातळीवर सीईटी घेत असत. AIIMS या देशातील नामांकित संस्थेत प्रवेश देण्यासाठी या परीक्षा द्यावीच लागते. दर वर्षी जवळपास 15 लाख विद्यार्थी ही परीक्षा देतात यातील फक्त 8 लाख विद्यार्थी पात्र होतात. तर प्रवेश घेण्यासाठी असतात 84 हजार जागा..! म्हणजेच आपल्या लक्षात येते की किती प्रमाणात स्पर्धा आहे.
2013 आधी NEET ला All India Pre Medical Test (AIPMT) म्हटले जात होते. या परीक्षेला सर्वोच्च न्यायालयाने असवैधानिक
ठरविले होते. 2014 व 2015 या वर्षी नीट न होता अखिल भारतीय वैद्यकिय प्रवेश पूर्व परीक्षा AIPMT घेण्यात आली . पण परत 2016 पासून पुढे NEET परीक्षा कायम करण्यात आली.
NEET Exam 2022 Detail in marathi
मग नीट प्रवेश परीक्षा National Testing Agency (NTA) द्वारे घेण्यात येते व निकाल और आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयात आरोग्य विभाग संचालक यांना सोपविण्यात येते. काही विशेष कायद्याने AIIMS और Jawaharlal Institute of Postgraduate Medical Education and Research (JIPMER) हे NEET प्रवेश परीक्षा अंतर्गत नाही येत.
NEET परीक्षा दोन प्रकारची असते.
NEET UG = UNDER GRADUATE ( पदवीसाठी)
NEET PG = POST GRADUATE
( पदव्युत्तर साठी )
NEET – UG(UNDER GRADUATE) ही परीक्षा जीवशास्त्र विषयासह बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना देता येते. हि परीक्षा दिल्यावर वैद्यकिय शिक्षणाची कवाडे खुली होतात. यात प्रामुख्याने MBBS, BDS, BHMS, BAMS, PHYSIOTHERAPHY, BUMS, BYNS, BSMS ,BPT, BVSci, B.Sci Nursing या वैद्यकिय शाखेतील शिक्षणाला प्रवेश पात्रता परीक्षा देऊन प्रवेश घेता येतो.
NEET Exam 2022 Detail in marathi
NEET – PG (POST GRADUATE) ही परीक्षा MBBS,BDS, तसेच आयुष BHMS, BAMS, BUMS यासारख्या वैद्यकशास्त्राच्या पदवी अभ्यासानंतर देता येते. म्हणजे हा मास्टर कोर्स ( M.D) आहे असे म्हणायला हरकत नाही.
नीट परीक्षा कोण घेत असते?
या परीक्षेला 2013 पासून सुरुवात झाली. या राष्ट्रीय पातळीवर होणारी नीट परीक्षा 2019 पर्यंत CENTRA BOARD OF SECONDARY EDUCATION (CBSE)घेत होती. तदनंतर 2018 परून National Testing Agency ही परीक्षा घेत असते. या बाबत तुम्ही Natioanl Testing Agency च्या संकेत स्थळावर माहिती घेऊ शकता.
बारावीनंतरच्या विद्यार्थ्यांसाठी नीट
परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेतली जाते.
NEET exam 2022 तारीख अजून जाहीर झालेली नाही.
वय मर्यादा – किमान सतरा वर्ष जास्तीत जास्त पंचवीस वर्ष होती पण आता यात बदल करत वयाची मर्यादा संपुष्टात आणली आहे.
किती वेळा देता येते? – फक्त तीनच वेळा देता येते.
किमान गुण :
सामान्य प्रवर्ग – 50%
आरक्षित प्रवर्ग – 40%
NEET Exam 2022 Detail in marathi
परीक्षा शुल्क :
सामान्य व इतर मागास प्रवर्ग – 1400/-
अ.जा/ अ. ज/ दिव्यांग/ तृतीपंथी – 750/-
कोटा :
परदेशी नागरिक , अनिवासी भारतीय हे 15% जागा राखीव आहेत.
परीक्षा स्वरूप :
भौतिकशास्त्र विषय ४५ प्रश्न व १८० गुण
रसायनशास्त्र विषय ४५ प्रश्न व १८० गुण प्राणीशास्त्र विषय ४५ प्रश्न व १८० गुण वनस्पतीशास्त्र विषय ४५ प्रश्न व १८० गुण
एकूण ७२० गुणांची परीक्षा होते व त्यासाठी ३ तासाचा कालावधी दिला जातो . प्रत्येक बरोबर उत्तरासाठी ४ गुण दिले जातात तर प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १ गुण वजा केला जातो .
नीट परीक्षा ११ प्रादेशिक भाषांमध्ये घेतली जाते . उमेदवार खालीलपैकी कोणतीही भाषा निवडून परीक्षा देऊ शकतो.
मराठी
हिंदी
इंग्रजी
उर्दू
तमिळ
तेलगू
उडिया
कन्नड
गुजराती
आसामी
बंगाली
NEET Exam 2022 Detail in marathi
फायदे :
NEET परीक्षा देण्याचा मुख्य फायदा म्हणजे विविध वैद्यकिय प्रवेश परीक्षा विद्यापीठ, महाविद्यालय घेत होते त्यामुळे वेग वेगळ्या परीक्षांचा अभ्यास करावा लागत होता. आता एकच परीक्षेचा अभ्यास करावा लागतो. तसेच विविध अभ्यासक्रमासाठी सुद्धा वेगळा अभ्यास करायचे व परीक्षा देण्याची गरज नाही . वैद्यकिय क्षेत्रात करिअर करण्यासाठी ही एक परीक्षा देली की तुम्हाला भारत भरात कुठेही प्रवेश घेऊ शकतो.
वादविवाद :
NEET परीक्षेला कर्नाटक व तमिळनाडू या राज्यांत विरोध दर्शविला आहे. या बाबत ते सर्वोच्च न्यायलायात प्रकरण आहे. तमिळनाडू या राज्याने न्या. राजन कमिटी स्थापन करत याचा उपयोग कसा होतो हे तपासले . या समितीने निदर्शनास आणून दिले की केंद्रीय शिक्षण मंडळचे CBSE विद्यार्थी पात्रतेत याच्या प्रमाणात जवळपास 38% वाढ झाली आहे. तर राज्य शिक्षण मंडळचे State Board विद्यार्थी पात्रतेत 58%-98% पर्यंत ढासळले. तसेच इंग्लिश मध्यामची विद्यार्थी जास्त पात्र ठरले राज्य मंडळ विद्यार्थी संख्येपेक्षा.
नीट परीक्षा पात्रता झालेले 28% विद्यार्थी हे पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाले तर 72% विद्यार्थी हे दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी झाले. यामुळे स्थानिक भाषिक अभ्यासक्रमाची विद्यार्थी मागे राहत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्या विद्यार्थ्यावर अन्याय होत असल्याचे दिसून येते.
देश भरात वैद्यकिय शाखेच्या जागा ही कमी असल्याने नीट परीक्षा देणारे विद्यार्थी, NEET exam 2022 detail in marathi
पात्र होणारे विद्यार्थी व प्रवेश घेणारे विद्यार्थी यात कमालीची तफावत अडळून येत आहे. 2014 या वर्षी देशात जवळपास 52 हजार जागा होत्या. तर आता 2021 या वर्षी 88 हजार जागा उपलब्ध आहे. यावरून दिसून येते की गत काही वर्षात जागा वाढल्या आहेत पण पाहिजे त्या प्रमाणात नाही. नीट परीक्षा अधिक माहितीसाठी नियमित campuskatta.com या संकेस्थळावर भेट देत रहावे