कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा बी.कॉम. (रिटेल) अभ्यासक्रम रोजगाराभिमुख – प्रा. व्ही. एल. माहेश्वरी

कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांची व्यावसायिकांशी संवाद बैठक

जळगाव, २२ मे २०२५ : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी रोटरी भवन, जळगाव येथे स्थानिक व्यावसायिकांशी संवाद साधत बी.कॉम. (रिटेल) या रोजगाराभिमुख अभ्यासक्रमाविषयी माहिती दिली. या वेळी महाराष्ट्र राज्य ॲप्रेन्टीसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्रॅम उपसमितीचे अध्यक्ष भरत अमळकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष विनीत जोशी, नवजीवन प्लसचे संचालक अनिल कांकरीया, तसेच विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे उपस्थित होते.

कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी स्पष्ट केले की विद्यापीठाने स्थानिक उद्योग व व्यवसायांची गरज लक्षात घेऊन असे अभ्यासक्रम रचना केली असून, यातून विद्यार्थ्यांना स्थानीक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. बी.कॉम. (रिटेल) हा चार वर्षांचा अभ्यासक्रम असून, शेवटच्या वर्षात विद्यार्थ्यांना ॲप्रेन्टसशिप करणे बंधनकारक असेल. त्यांनी उपस्थित व्यावसायिकांना विद्यार्थ्यांना ॲप्रेन्टसशिपच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले.

Advertisement
Kavayatri Bahinabai Chaudhary North Maharashtra University's B.Com. (Retail) course employment-oriented - Prof. V. L. Maheshwari

या प्रसंगी बोलताना भरत अमळकर यांनी सांगितले की, ॲप्रेन्टसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्रॅम हे शिक्षण व उद्योग क्षेत्रातील दरी भरून काढण्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे. उद्योग जगताच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक कौशल्ये विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून हा अभ्यासक्रम राबवला जात आहे.

कार्यक्रमात नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. राजेश जवळेकर, व्यवस्थापन शास्त्र प्रशाळेच्या संचालिका प्रा. मधुलिका सोनवणे, आणि पीजी प्रमुख प्रा. रमेश सरदार हेही उपस्थित होते. प्रास्ताविक विनीत जोशी यांनी केले. संवाद बैठकीस जळगाव शहरातील १९ व्यावसायिकांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

हा उपक्रम विद्यापीठ आणि उद्योग क्षेत्रातील सशक्त भागीदारीचे उदाहरण ठरत असून, आगामी काळात अशा रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक संधी आणि उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *